आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:चार्टर प्लेनने प्रथमच मराठवाड्यातील 120 पर्यटक जाणार जयपूरला; औरंगाबाद, बीड, परभणीकरांनी केेले घाऊक बुकिंग

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनानंतरचे अनलॉक : पर्यटन पूर्वपदावर येण्याचे शुभ संकेत

शहरातील एक खासगी पर्यटन कंपनी चार्टर विमानाने १२० पर्यटकांना १० दिवसांच्या टूरवर राजस्थानला घेऊन जात आहे. चार्टर फ्लाइटने पर्यटकांना नेण्याची ही पहिलीच वेळ. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पर्यटन व्यवसायाला पूर्वपदावर आणण्यासाठी हा टूर “टर्निंग पाॅइंट’ ठरेल, असा आयोजकांना विश्वास आहे.

लॉकडाऊनआधीच भारतीय पुरातत्त्व खात्याने गेल्या १७ मार्चपासून देशभरातील स्मारके बंद केली होती. तेव्हापासून पर्यटन बंद होते. या स्थितीत वेळेचा सदुपयोग करत स्मिता हॉलिडेजने या “जम्बो टूर’ची योजना आखली. त्यास मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीचे संचालक जयंत गोरे यांनी सांगितले.

कोरोनासाठी विशेष काळजी : प्रवासापूर्वी प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक असून प्रवासातही तापमान व ऑक्सिजन तपासले जाईल. मास्क, सॅनिटायझर आवश्यक आहे. २० पर्यटकांमागे एक प्रतिनिधी असेल. नियमांनुसारच प्रवास होईल. लॉकडाऊनपूर्वी आमच्याकडे ७०० बुकिंग होते. आम्ही पैसे परत करण्याऐवजी आहे त्याच किमतीत अनलॉकनंतर टूरवर नेण्याचे कबूल केले. विमान कंपन्या आणि हॉटेलकडूनही पैसे परत घेण्याऐवजी तो अनलॉकनंतर वापरू. लवकरच तिरुपतीला ७२ तर दिल्लीला १६० पर्यटकांना नेणार आहोत, असे गोरे म्हणाले.

असा एकत्र प्रवास १० लाख रुपयांनी स्वस्त पडतो
जयंत गोरे म्हणाले की, जुने ग्राहक राजस्थान टूरसाठी विचारत होते. सर्वांना एकत्रित नेण्याचा विचार आला. पाहता पाहता १२० जण तयार झाले. त्यासाठी मुंबईहून स्वतंत्र विमान बुक केले. तेथील बुकिंग औरंगाबादपेक्षा १० लाख रुपयांनी स्वस्त पडली. जाताना गो-एअर तर येताना एअरव्हिस्टाच्या विमानाने २२ फेब्रुवारी ते ३ मार्च अशी १० दिवसांची ही सहल असेल. कोराेनापासून सुरक्षिततेसाठी चार्टर प्लेनच्या माध्यमातून पर्यटनाला पसंती मिळतेय. त्या दृष्टीने ही सहल औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायासाठी “टर्निंग पॉइंट’ ठरेल. औरंगाबाद विमानतळाने मुंबईप्रमाणे किफायतशीर दरात विमान उपलब्ध करून दिले तर पर्यटनवाढीसाठी फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...