आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशन अंतर्गत गंगापूर तालुक्यातील 262 गावांना 888 कोटीची योजना मंजुर करण्यात आली आहे. नळाव्दारे पाणीपुरवठ्याच्या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी पहिल्यांदा ड्रोनव्दारे सर्वेक्षण मान्यही योजना मंजूर करण्यात आली असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले. शाश्वत पाणीस्रोतातून होणाऱ्या या योजनेचा वीज खर्च सौर ऊर्जेमुळे वाचणार आहे . निविदा मंजूर झाल्या तर महिनाभरात योजनेचे काम सुरू होणार असल्याचा दावा बंब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
बंब यांनी सांगितले की, गंगापुर तालुका हा पुर्वीपासुनच आवर्षणग्रस्त टँकरग्रस्त असल्याने तालुक्यासाठी एकच शाश्वत ग्रीड पाणी पुरवठा योजना घेणे बाबत मी सातत्याने पत्रव्यवहार, पाठपुरावा, बैठका घेण्यात आल्या. गंगापुर तालुक्याचे ग्रामीण भागाचे एकुण क्षेत्रफळ हे 1253 कि.मी. इतके आहे. क्षेत्रफळ जास्त असल्याने योजनेच्या सर्वेक्षणाला प्रदीर्घ कालावधी लागेल ही बाब विचारात घेऊन, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे मी मागणी व पाठपुरावा केला. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे.
दीड कोटीतून ड्रोनच्या माध्यमातून केले सर्वेक्षण
या योजनेचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यासाठी मे टंडन अर्बन सोल्युशन्स मुंबई यांची नेमणुक करण्यात आली. पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी नळ कोठून टाकायचे, खड्ड्यांची लांबी, रुंदी व खोली, यासह अन्य तांत्रिक सर्वेक्षणासाठी खूप अधिक वेळ लागला असता. मात्र, मुंबई येथील टंडन अर्बन सोल्युशन्स या एजन्सी मार्फत 30 दिवसांत पाणीपुरवठा करण्यात आला. या ड्रोन सर्वेक्षणासाठी दीड कोटी रुपयांचा ड्रोन वापरण्यात आला. पोलिस अधीक्षकांकडून त्यासाठी परवानगी घेण्यात आली. पाणीपुरवठा योजनेसाठी ड्रोनव्दारे सर्वेक्षण करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचा दावाही आमदार बंब यांनी केला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.