आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:पहिल्यांदाच विश्वकर्मांच्या अभिषेकासाठी कुरिअरने आणले 33 नद्यांचे 8 लिटर पाणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त पहिल्यांदाच ३३ नद्यांच्या जलाने अभिषेक करण्यात आला. शुक्रवारी शास्त्रीनगर हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यासाठी कुरिअरने ८ लिटर जल मागवण्यात आले होते. प्रभू विश्वकर्मा युवा एकत्रीकरण बचत गटातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. ४० दांपत्यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले.या ठिकाणी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पर्यावरण, आई तुळजाभवानी, स्त्री सबलीकरण अशा विषयांवर सुरेख अशा रांगोळ्या रेखाटल्या.

३३ नद्यांच्या पाण्याने अभिषेक : भगवान विश्वकर्मा यांचे पावित्र्य टिकवून राहावे व संस्कृती जोपासण्यासाठी मागील वर्षी सात नद्यांचे पाणी आणून अभिषेक करण्यात आला होता. या वर्षी लक्ष्मीकांत हरेल व दिगंबर हरेल यांच्या पुढाकाराने गंगा, यमुना, शिप्रा, नर्मदा, गोदावरी, ब्रह्मपुत्रा, कावेरी या सप्तनद्यांसह नेपाळमधील कालीगंडकी नदीचे पाणी आण्ण्यात आले होते. या नदीला २६ नद्या येऊन मिळतात, असे हरेल म्हणाले. अभिषेकाला समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. समाजात कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अॅड. अभय टाकसाळ, डॉ. संजीवकुमार पांचाळ यांनी मार्गदर्शन केले. १२०० समाजबांधवांसाठी महाप्रसाद करण्यात आला.

खासगीकरणाविरोधात उभे राहावे लागेल : अॅड. टाकसाळ देशात सातत्याने होणारे खासगीकरण देशातील एससी, एसटी, ओबीसी, एनटी सर्वांसाठी घातक आहे. शासनात असलेले आरक्षण यामुळे संपुष्टात येईल. आगामी काळात समाजापुढे उभे असलेले संकट ओळखा. खासगीकरणाविरोधात दंड थोपटून उभे राहा, असा सल्ला अॅड. अभय टाकसाळ यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...