आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादच्या नवीन काॅलेजमध्ये डाॅक्टरांची नियुक्ती:शासनाला विविध जागा भरण्याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने उस्मानाबाद येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर, लातूर, अंबाजोगाई आणि औरंगाबाद येथील 28 तज्ज्ञ डॉक्टरांना नियुक्त केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित शहरात रुग्णांना उपचार करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी सहाय्यक प्रोफेसर, प्रोफेसर आणि डिनच्या नियुक्तीसंबंधी राज्यशासनाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. घाटी येथे औषधी उपलब्ध होत नसल्याचे खंडपिठाच्या सुनावणीप्रसंगी निदर्शनास आणून देण्यात आले. संबंधित शपथपत्र शासनाने 21 सप्टेंबरपर्यंत द्यावे असेही खंडपीठाने निर्देश दिले आहेत.

घाटीत सुविधा आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे यासाठी खासदार इम्तीयाज जलील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. घाटीतील कार्डिओ व्हॅस्कुलर थोरॅसिक सर्जन डॉ. आशिष भिवापूरकर यांना यापूर्वीच्या सुनावणीत प्रतिवादी करण्याची विनंती खा. जलील यांच्यावतीने करण्यात आली होती. खंडपीठाने डॉ. भिवापूरकर यांना तात्काळ प्रतिवादी करण्याचे आदेश मंगळवारी (6 सप्टेंबर) दिले. खंडपीठात खा. जलील यांनी माहिती देताना सांगितले की, हापकिन च्या माध्यमातून औषधी खरेदी करताना वेळेवर पुरवठा होत नाही.

डिन यांना औषधी खरेदीचे अधिकार होते तेव्हा दोन ते तिन दिवसात औषधी उपलब्ध होत होती. औरंगाबादसह सोलापूर, लातूर आणि अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाच्या 28 तज्ज्ञ डॉक्टरांना नवीन उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात सेवा देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. यामुळे संबंधित रूग्णालयात रूग्णांना सेवा देण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होत नाही.

नवीन उस्मानाबाद ेयथील रूग्णालयात राष्ट्रीय वैद्यकीय समितीच्या भेटीदरम्यान संबंधित डॉक्टरांना थांबविले जाते असेही खा. जलील यांनी निदर्शनास आणून दिले. घाटी येथील कान नाक घसा तज्ञाला उस्मानाबाद येथे पाठविल्याने येथील रूग्णांचे निदान करण्यासाठी डॉक्टर नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे खा. जलील यांनी सांगितले. याचिकेची पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. याचिकेत खा. जलील यांनी बाजू मांडली. त्यांना अ‌ॅड. प्रसाद जरारे यांनी सहाय्य केले.

बातम्या आणखी आहेत...