आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पहिली-दुसरीच्या इयत्तेतील मुलांच्या प्रगतीसाठी आता जिल्हा परिषद आई-बाबांचीच घेणार ऑनलाइन शाळा

नांदेडएका महिन्यापूर्वीलेखक: शरद काटकर
  • कॉपी लिंक
  • घरी अभ्यास घेण्यासाठी नांदेडमध्ये पालकांना दिले जात आहे प्रशिक्षण

कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात असले तरी म्हणावे तसे परिणाम दिसत नाहीत. उलट विद्यार्थ्यांचे नुकसानच झाले. ही बाब लक्षात घेऊन नांदेड जिल्हा परिषदेने पालकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाल्यांना शिकवण्यासाठी पालकांनाच प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालकच घरी शिकवणार आहेत. मुलांना नेमके शिकवायचे कसे याचे धडे मात्र जि.प. व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात १६० आई-बाबांची निवड करून त्यांची ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आली.

जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून प्रत्येकी पाच याप्रमाणे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण सुरू झाले आहे. पालकांशी संवाद साधून शिक्षक आणि पालक यांचे आठ-आठ तालुक्यांचे दोन ग्रुप तयार केले आहेत. “आम्ही कधीच मुलांना शिकवले नाही, आमचे काम नाही,’ असा सूर सुरुवातीला पालकांनी लावला होता.

पालकांनी मुलांना वेळ द्यावा
पालकांमध्ये ‘माझे पाल्य, माझी जबाबदारी’ ही संकल्पना रुजवायची आहेे. पालकांनी मुलांना अर्धा तास वेळ दिला तरी मुलांची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. यातील निकालावरून जिल्ह्यात सर्व ठिकाणी उपक्रम राबवला जाणार आहे. - डॉ. रवींद्र आंबेकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था.

असे आहे प्रशिक्षणाचे नियोजन

  • १५ जूनपासून १८ जुलैपर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ९ या वेळेत ऑनलाइन प्रशिक्षण.
  • शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करावा, धडा कसा शिकवयाचा, मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड, शैक्षणिक तंत्र शिकवले
  • सोमवारी भाषा आणि गुरुवारी गणित या विषयांचे मार्गदर्शन.
  • प्रत्येक रविवारी पालकांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते.
  • मंगळवार ते शनिवारपर्यंत पालक मुलांना शिकवतात.
  • जेमतेम शिकलेले पालकही विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.
  • चित्र वर्णन, परिसराचे ज्ञान, आरोग्य केंद्राची माहिती, निरीक्षण क्षमता विकसनासाठी मदत.
बातम्या आणखी आहेत...