आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्तमजुरी:कृषी अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सक्तमजुरी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीचे मोजमाप करण्यासाठी गेलेल्या कृषी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करीत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी, विविध कलामांखाली ८ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्या. व्ही. एम. सुंदाळे यांनी ठोठावली. अनिल माणिकराव पालोदे (रा. चांदापूर, ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे.

कृषी अधिकारी विठ्ठल हिरालाल सतुके (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१८-१९ मध्‍ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सोनपावाडी शिवारात सिमेंट नाला खोलीकरण कामाचे कार्यारंभ आदेश सुशिक्षित बेरोजगार सुरेश जैस्वाल यांना दिले होते. या गटावर दगडी पिचिंग वगळता उर्वरित काम पूर्ण झाले होते. संबंधित कामाचे मोजमाप करून नोंदणीसाठी ३० मार्च २०१९ रोजी दुपारी फिर्यादी, मंडळ कृषी अधिकारी सचिन गिरी, कृषी पर्यवेक्षक भरत जाधव, कृषी सहायक असे चौघे गेले होते. काम सुरू असताना तेथे अनिल पालोदे आला. त्याने कामाचे मोजमाप मी सांगेल त्या पद्धतीने घ्या, असे म्हणून वाद घालून कामात अडथळा निर्माण केला. त्याला समजावून सांगत असताना त्यानेे फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तत्कालीन जमादार डी. टी. जाधव यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी लोकाभियोक्ता मनीषा गंडले, बी. एन. अढावे यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

बातम्या आणखी आहेत...