आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकीत पेट्रोल भरून घराच्या दिशेने परतणाऱ्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दूसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री तिसगाव परिसरात घडली.
अपघातात सुभाष नाना आर्या (35 रा. ता. शेदवा जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश ह. मु. सिडको वाळूजमहानगर) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असणारे भोला गोपाल सिंगोरिया (33) हा गंभीररीत्या जखमी झाले. घटनेनंतर तिसगाव येथील प्रेम जाधव व त्याच्या मित्रांनी दोघांना त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात मदत केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकाम कामगार म्हणून काम करणारे सुभाष व भोला हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. घटनेच्या दिवशी मुंबई-नागपूर महामार्गावर असणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी दोघेजण सिडकोतून दुचाकीने गेले.
पेट्रोल टाकुन परत येत असताना तिसगाव चौक परिसरात नव्याने तयार झालेल्या उड्डाणपूलालगत त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात सुभाष खाली पडून धडक देणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. तर, भोला बेशुद्ध होऊन निपचित पडून राहिला. याच दरम्यान तिसगाव येथील प्रेम जाधव हे आपल्या मित्रांसोबत घरी निघाले होते. त्यांनी अपघातग्रस्त दोघांना बघून घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.
त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सुभाष व भोला यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पुढे अजय आर्या व मुकेश दुडवे यांच्या मदतीने बेशुद्धावस्थेतील दोघांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान 16 जून रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुभाष यास मृत घोषित केले. तर गंभीर जखमी भोलावर उपचार सुरू केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार गिरी करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.