आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी एक्सक्लुझिव्ह:देशातील 17 शहरांत विदेशींवर उपचार होणार, मेडिकल टुरिझमसाठी व्हिसा सहज मिळणार

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात उपचारासाठी येणारे विदेशी रुग्ण आणि त्यांची देखभाल करणाऱ्यांची व्हिसा प्रक्रिया सुलभ केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मंत्रालयांसोबत मिळून योजना आखली आहे. येत्या ५ वर्षांत देशात मेडिकल टुरिझम ६ अब्ज डॉलरवरून(४७ हजार कोटी रु.) वाढून १३ अब्ज डॉलर(१ लाख कोटी रु.) करण्याचे उद्दिष्ट आहे. विदेशींनी भारतात उपचारासाठी येण्याचे केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या दोन टप्प्यात १२ राज्यांतील १७ शहरे निश्चित केली आहेत. या शहरांत दिल्ली, गुडगाव,अहमदाबाद,मुंबई, पुणे, चंदीगड, अमृतसर आदींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात संबंधित शहरांतील ३७ खासगी रुग्णालयांची निवड केली. जेथे आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत नाहीत,अशा राज्यांचा यात समावेश केला नाही.

आयुष उपचार पद्धती हा विदेशी रुग्णांसाठी पहिला पर्याय

भारताच्या पारंपरिक वैद्यकीय पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी विदेशी रुग्णांना आयुष पद्धतीने उपचार करण्याचा पहिला पर्याय दिला जाईल. दुसरीकडे, हृदय शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यर्पण, गुडघ्याच्या प्रत्यारोपणासारख्या उपचारावर लक्ष केंद्रित केले जाईल. कारण, सध्या याच सेवांसाठी जास्त विदेशी रुग्ण भारतात येत आहेत.

कोणत्या देशातून किती आले

बांगलादेश 57.53% इराक 8.07% मालदीव 7.31% अफगाणिस्तान 4.73% ओमान 3.21%

दरवर्षी आले विदेशी रुग्ण

2015 2,33,918 2016 4,27,010 2017 4,95,056 2018 6,40,798 2019 6,97,453 महाराष्ट्र,प.बंगाल, गुजरात,हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब,तेलंगण, आंध्र, आसाम, केरळ यांचा समावेश.

बातम्या आणखी आहेत...