आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण:मानपान विसरून कामात गुणवत्ता आणा : गटणे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राम सचिवालय, संसदेचे आपण अधिकारी आहोत, गावात मोठ्या पदावर कार्यरत आहात, अशा मानपानाच्या अपेक्षा विसरत आपल्या कामातून गुणवत्ता आणा. गावाचा विकास करा, असे आवाहन रविवारी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी केल्या. तापडिया नाट्यमंदिरात रविवारी ४५ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ग्रामसेवकाने आपल्या कामाचे स्वरूप बदलावे, हे माझे काम नाही असे सांगून स्वतःचे महत्त्व कमी न करता वरिष्ठांच्या आदेशाची पूर्तता करावी. पंचायत विभागाची कामे हेच ग्रामसेवकाचे काम आहे, असे नसून जिल्हा परिषदेतील विविध १५ विभागांची कामेही ग्रामसेवकाने करावीत, अशा सूचनाही गटणे यांनी केल्या.

नूतन मुख्य कार्यकारी विकास मीना म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारांप्रमाणे खेडे समृद्ध झाले पाहिजे. गावाचा केंद्रबिंदू म्हणून ग्रामसेवकाकडे पाहिले जाते. त्यामुळे गावाच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील अशी कामे करावित. विविध अधिकारी आपल्या पदावर असताना महत्त्वपूर्ण कामे व संकल्पना राबवतात परंतु बदली झाली की त्यांची कामे तशीच राहतात, ही कामे ज्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांनी पुढे न्यावीत. दरम्यान, नीलेश गटणे यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे नेण्याचे आश्वासनही मीना यांनी दिले.

जबाबदारीने काम करा
अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना १० ते १२ वेळेस शिस्तभंगाच्या नोटिसा मिळाल्या आहेत. परंतु ते कोणताही ताण घेत नाहीत. ‘बोनाफाइड’ चुका असतील तर अधिकारी सांभाळून घेतो, परंतु मालाफाइड चुका असतील तर त्या स्वतःला व आपल्या कुटुंबालाही अडचणीच्या असतात. त्यामुळे जबाबदारीने काम करावे, असा सल्लाही गटणे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...