आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या पूर्व विदेश मंत्री हिलरी क्लिंटन 7 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरात येत आहेत. त्यांचा औरंगाबादेत 2 दिवस मुक्काम असणार आहे. यावेळी त्या वेरूळ लेणी पाहणार असून घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन देखील घेणार आहे.
हिलरी क्लिंटन औरंगाबादमध्ये दोन दिवस मुक्कामी असणार आहेत. 7 फेब्रुवारीला मंगळवारी क्लिंटन या चार्टर फ्लाईटने अहमदाबाद वरून दुपारी तीनच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर त्या खुलताबादमध्ये जाणार आहेत.
हिलरी क्लिंटन यांनी अहमदाबाद मध्ये सेल्फ इम्पावर्ड वुमेन असोसिएशनच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच एसईडब्ल्यूएच्या संस्थापिका सामाजिक कार्यकर्ता तसेच गांधीवादी इला भट्ट यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. सोमवारी हिलरी क्लिंटन गुजरातच्या सुंदर नगर जिल्ह्यात आहेत. तर 7 फेब्रुवारीला औरंगाबाद मध्ये त्यांचा दौरा असणार आहे.
घृष्णेश्वर मंदिराचे घेणार दर्शन
आठ तारखेला हिंलरी क्लिंटन प्रसिद्ध अशा घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन देखील घेणार आहे. तसेच वेरूळ येथील लेण्यांना देखील त्या भेट देणार आहेत. 8 फेब्रुवारीला त्यांचा मुक्काम असणार आहे. तर 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता त्या औरंगाबाद वरून वाराणसीला रवाना होणार आहेत. त्यांच्या सुरक्षितच्या दृष्टीने पोलिसांच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
कोण आहेत हिलरी क्लिंटन?
हिलरी रॉडहॅम क्लिंटन या अमेरिकेतील राजकारणी आहेत. 2009-13 दरम्यान बराक ओबामा यांच्या मंत्रीमंडळामध्ये त्या देशाच्या 67 व्या परराष्ट्र सचिव राहिल्या आहेत. 2001-09 दरम्यान न्यूयॉर्क राज्याची सेमेटर व 1993-2001 दरम्यान बिल क्लिंटनची पत्नी ह्या नात्याने अमेरिकेची प्रथम महिला राहिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.