आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, सिग्मा रुग्णालयात घेत आहेत उपचार

औरंगाबाद (संतोष देशमुख)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनाही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोना संसर्गाची लक्षणे जाणवत होती. तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे लगेच पुढील उपचारासाठी सोमवारी रात्रीच त्यांना सिग्मा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. उन्मेश टाकळकर यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

शहर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. २४ हजार २८६ कोरोनाबाधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६ हजारांवर रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. त्यात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची देखील सोमवारी भर पडली आहे. घोडेले यांना गत चार दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. प्रथम त्यांनी उपाचर केले असता थोड बरं वाटले. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती खालावत चालली होती. श्वास घेण्यास जड जाणे, अंग दुखी आदी कोरोना लक्षणाचे सर्वच त्रास होत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. सिग्मा हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भरती होऊन १२ तास झाले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. टाकळर यांनी स्पष्ट केले.

महापौरांनी मनपा कोविड सेंटरमध्ये उपाचार का घेतले नाहीत?

मनपाचे सिपेट, क्लिअर्क, देवगिरी, शासकीय अभियांत्रिकी, एमजीएम, पद्मपुरा, एमआयटी, मेल्ट्रॉन असे कोविड सेंटर आहेत. चार हजारांवर कोविड रुग्णांवर येथे उपचार सुरु आहेत. हे सर्व रुग्ण विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. सोमवारी सिपेट सेंटरमध्ये जेवणात अळ्या निघाल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांत जोरदार हाणामारी झाली. वेळेत उपचार मिळत नाहीत म्हणून रुग्ण जीवाशी जात आहेत. असे असतानाही संयम व शिस्त बाळगून चार हजारांवर हे सर्व रुग्ण कोरोना संसर्गाचा सामना करत आहेत. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील मनपा कोविड सेंटरमध्येच उपाचार घ्यायला हवे होते. मात्र, सत्ता जेथे उपभागायची तेथील रुग्णालाये व तेथील उपचारांवर अविश्वास दाखवून खासगी थ्री स्टार हॉस्पिटलमध्ये उपाचर घेण्यास पसंती दिली. यामुळे सर्वसामन्य शहरवासीयांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ते टिका करू लागले आहेत.