आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांचे निधन, 16 जुलै रोजी झाली होती कोरोनाची लागण

निलंगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. 16 जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी या वयातही कोरोनाला हरवले होते. त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातील नॉन कोरोना वॉर्डात हलवण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास किडनीच्या विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज निलंग्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 16 जुलै रोजी लातून येथील खासगी रुग्णालयात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवले होते. येथे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली होती. मात्र बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवाजी निलंगेकर 1985 ते 86 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याआधी त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर त्यांचे नातू होत.

निलंगेकर यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला होता. मात्र असे असूनही स्वातंत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही.

बातम्या आणखी आहेत...