आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद वार्ता:माजी माहिती आयुक्त धारूरकर यांचे निधन

आैरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी माहिती आयुक्त, देवगिरी तरुण भारतचे माजी संपादक दिलीप लक्ष्मीकांत धारूरकर (६०) यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्रकार पत्नी संगीता धारूरकर, एक मुलगा, विवाहित कन्या, ज्येष्ठ बंधू प्रा. डाॅ. वि. ल. धारूरकर यांच्यासह दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

२०१४ मध्ये धारूरकर यांची माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. आैरंगाबाद व नागपूर विभागात त्यांनी काम केले होते. दिलीप धारूरकर यांच्यावर मागील काही महिन्यांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपासून त्यांच्यावर डाॅ. हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू होते. साेमवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील रहिवासी असलेले दिलीप धारूरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते.

मुख्यमंत्र्यांच्या संवेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. धारूरकर यांच्या रूपाने परखड, अभ्यासू पत्रकार, विचारवंत,

असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व गमावले असून माहिती आयुक्त म्हणून त्यांनी केलेले काम स्मरणात राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...