आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून सन्यास घेतला आहे. त्यांनी फेसबूकवर व्हिडीओ जारी करुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून, पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे.
जाधव यापूर्वी दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या पराभवामुळे ते काही काळ अस्वस्थदेखील होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि कौटुंबिक कारणांमुळे जाधव हे चर्चेत होते. अखेर हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
हर्षवर्धन जाधव नेमके काय म्हणाले?
'सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान सर्वजण आपापले छंद जोपासत आहेत. मीदेखील अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला आहे. त्यातून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची मला जाणीव झाली. आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की, आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्या सर्वांना जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण संजनाकडून सोडवून घ्यावे, अशी मी विनंती करतो. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या. पण त्यामुळे काही वेगळ्या गोष्टी घडत असतील, असा त्याचा अर्थ नाही. मी संजना जाधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायभान जाधव यांच्या आशीर्वादाने आणि केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चतच उत्तुंग भरारी घेतील, याबाबत शंका नाही. आपण कृपया यापुढे राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा. ते सगळे फोन उचलतात', असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.