आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयएममधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे माजी नगरसेवक विकास प्रकाश एडके (४४, रा. पदमपुरा) यांनी जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर व युवा जिल्हाध्यक्ष मुन्शी पटेल यांच्यावर जातीयवादाचा ठपका ठेवत अॅट्रॉसिटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यावरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकारणासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे एडके २०१५ मध्ये एमआयएमकडून खडकेश्वर वॉर्डातून एससी प्रवर्गातून नगरसेवक झाले होते. ८ मार्च रोजी रात्री त्यांचा कंत्राटदार मित्र सय्यद सलाउद्दीन यांना मारहाण झाल्याचे कळले. त्यांना मदत करण्यासाठी एडके सिटी चौक पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा हॉटेल ताजच्या बाहेर समीर बिल्डर, मुन्शी पटेल, अनीस खान, सोहेल पार्टी यांनी मारहाण करून इनोव्हा कार फोडल्याचे सांगितले. त्यांच्यात चर्चा सुरू असताना साबेर हुसेन, समीर साजेद बिल्डर पोहोचले. त्यांनी मला तक्रार न देण्यासाठी दबाव टाकला. मात्र, ठाण्याबाहेर येताच एडके यांचा समीर बिल्डरने जातिवाचक उल्लेख करत मारण्याची धमकी दिली. ‘तक्रार दिल्यास तुमचे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी देत मुन्शी पटेलनेदेखील जातिवाचक शिवीगाळ केली. “आमच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, पोलिस आमचे काही करू शकले नाही, तुझ्या तक्रारीने काय होणार?’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या वेळी सालम बावजीर, अब्दुल रहीम, शेख अश्पाक, मोहिमीन खान हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून समीर बिल्डर व मुन्शी पटेलवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.