आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडकरांसाठी मोठा दिलासा:माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना अखेर यश, बीडमध्ये होणार 200 खाटाचे नवीन अद्ययावत रुग्णालय

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या शेजारीच असलेल्या जागेवर अतिरिक्त २०० खाटाचे रुग्णालय व्हावे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या दोनशे खाटाच्या रुग्णालयासाठी ५० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

बीड येथे जिल्हा रुग्णालयात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी २०० खाटाचे अतिरिक्त रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. माजी मंत्री क्षीरसागर हे पालकमंत्री असतानाच या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी देखील या कामासाठी प्रयत्न केले. रुग्णालयासाठी हवी असलेली जागा ही गृहविभागाकडे होती. त्यामुळे माजीमंत्री क्षीरसागर यांनी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ही जागा जिल्हा रुग्णालयासाठी हस्तांतरित केली, त्याच वेळी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे पूर्ण झाली, आता ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या रुग्णालयाचे देखील तात्काळ काम सुरू होणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून माजी मंत्री क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे रायमोहा आणि शिरूर या ठिकाणी देखील अद्यावत रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...