आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कामठा येथील माजी सरपंचाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू, कळमनुरी येथे झाला अपघात

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथील तहसील कार्यालयाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कामठा येथील माजी सरपंच अशोकराव संभाजी मोरे यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. १६ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामठा येथील माजी सरपंच तथा स्वस्त धान्य दुकानदार अशोकराव संभाजी मोरे (५५) हे आज सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर (क्र.एमएच-३८-एस०१६२) कळमनुरी येथे आले होते. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते परत गावाकडे निघाले होते. मात्र कळमनुरी येथील तहसील कार्यालयाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या येणाऱ्या ट्रकने (क्र.एमएच-१८-बी-७२२७) मोरे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे हिंगोली व नांदेड मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. तर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, पोलिस कर्मचारी रामचंद्र जाधव, पी. आर. थोरात, सुर्यकांत भारशंकर, जगन पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतुक सुरळीत केली. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत कळमनुरी पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser