आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर:शिवसेनेचे माजी आमदार आर.एम. वाणी यांचे पहाटे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वैजापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार संस्कार करण्यात आले.

वैजापूर नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष ते सलग तीनदा विधानसभा सदस्य असा ५० वर्षाचा प्रदीर्घ राजकीय वाटचालीत विकासाची भुमिका साकारणारे शिवसेनेचे लोकनेते माजी आमदार आर.एम.वाणी यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने ८४ व्या वर्षी निधन झाले. पंधरा दिवसापूर्वी त्यांची प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांची पहाटे प्राण ज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी ४ मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे.

अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार संस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे मान्यवर, कार्यकर्ते मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. शिवसेनेकडून १९९९ ते २०१४ पर्यत त्यांनी सलग तीनदा वैजापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचा विक्रम त्यांनी केला. वैजापूर शहरासह व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, सिंचन प्रकल्प, कृषी विकास, आरोग्य, सहकार, शैक्षणिक, सामाजिक प्रश्नावर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करण्याची प्रामाणिक भुमिका बजावली.

कायम दुष्काळाची झळ सोसणा-या वैजापूर, गंगापूर तालुक्यातील ४३ हजार हेक्टर शेतीला बारमाही सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा लाभ देण्यासाठी त्यांनी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात पाणी सोडावे या मागणीसाठी २००३ या वर्षात तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात ३९ दिवस लाभक्षेत्रातील शेतक-यांचे जेलभरो आंदोलन केले होते. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी वैजापूर तालुका कडकडीत बंद ठेवण्याचे आक्रमक आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून केले होते. या आंदोलनाची दखल तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी घेतली होती. येथील दुष्काळाची पाहणी दौरा राज्यपाल फजल यांनी करुन सरकारला पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. या प्रकल्पामुळे वैजापूर, गंगापूर तालुक्यातील १०० गांवातील शेत शिवार सिंचनाच्या मुख्य प्रवाहात आली.

१९८५ ते १९९५ पर्यत वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी कुशलपणाने सांभाळली. भीषण पाणी टंचाईच्या विळाख्यात सापडलेल्या वैजापूर शहराला पिण्यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाकडून नियमित मासिक पाणी आवर्तन मिळवण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रश्नावर त्यांनी अभ्यासपुर्ण याचिका दाखल करुन नगर पालिकेचा पाणी प्रश्नाची न्यायालयीन लढा जिंकून वैजापूरकरांची तहान भागवण्याचे काम त्यांनी केले. जलसंधारण अभियानाच्या पारितोषिकाच्या रक्कमेतून त्यांनी पंचायत समिती सुसज्ज प्रशासकीय इमारत राज्य शासनाची आर्थिक मदत न घेता साकारली. बाजार समितीत शेतक-यासाठी रासायनिक खत विक्री केंद्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घायगाव लिलाव केंद्र असे लक्षणीय विकास कामे त्यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...