आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमजीएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६० मध्ये साेमवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागली. डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत वाॅर्डातील १४ रुग्ण दुसरीकडे स्थलांतरित केले. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वीज खंडित करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. रुग्णालयातील तळमजल्यावर असलेल्या मनोविकार विभागालगत असलेल्या खोलीतून अचानक धूर निघू लागला. त्यानंतर कोड रेड अलर्ट (सावधानतेचा इशारा) देताच डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉयसह सतर्क झाले.
एमजीएमच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शेख समी व त्यांच्या पथकातील आठ कर्मचाऱ्यांना वीज खंडित करून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. आमच्या विभागाकडून एमजीएमचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना नियमित आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे प्रसंगावधान राखून परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला, असे शेख समी यांनी सांगितले. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये असलेल्या वाॅर्डालगतच्या खाेलीतून धूर निघत होता, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. के. सोमाणी यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.