आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:90 च्या दशकात जन्मलेल्या 40 टक्के लोकांना इंटरनेटविना 4 तासही राहवेना

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९० च्या मध्यावर जन्मलेल्या ३० ते ३५ वर्षांच्या (झेड जनरेशन) तरुण पिढीतील ४० टक्के लोक इंटरनेटविना ४ तासही राहू शकत नाहीत. याच पिढीतील ५० टक्के लोक गेल्या पाच वर्षांपासून कोणताही निर्णय घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यावर अवलंबून असतात. कोविडच्या काळात लॉकडाऊनने संपूर्ण सामाजिक ताण्याबाण्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु याच झेड जनरेशनच्या लोकांनी इंटरनेटचा सुयोग्य वापर करून सामाजिक ताणाबाणा टिकवून ठेवण्याचे काम केले. झूम मीटिंग, टेलिमेडिसिनचा वापर करून प्रत्येक प्रकारचे काम सोपे केले. सामाजिक संपर्क, पारदर्शकता आणि वेग याचा अनुभव देऊन त्याचा वापर करण्यासाठी इंटरनेट फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. १९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेल्या पिढीतील ७१ टक्के अपॉइंटमेंट व इतर गोष्टी अॅपवर ऑनलाइन घेणे पसंत करतात. झेड जनरेशनच्या लोकांना ऑनलाइन किंवा प्रायव्हेट अशी कोणतीही अडचण वाटत नाही, परंतु कोरोनानंतर कार्यालयात जाण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम त्यांना जास्त पसंतीचे आहे.

झेड पिढी इंटरनेटला नॉलेज ऑफ सोर्स मानते

झेड पिढी इंटरनेटकडे ज्ञानाचा स्रोत या रूपात पाहते. म्हणूनच ते शॉपिंगला जाण्यापासून मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी इंटरनेटवर सर्चिंग करून माहिती घेतल्यानंतर निर्णय घेतात. भौतिक तसेच भावनात्मक पातळीवर ऑनलाइन राहणे पसंत करतात. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचे उत्तर इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

ऑनलाइन ओळख असलेले मित्र पसंत {५१% ऑनलाइन ओळख असलेल्यांना मित्र बनवण्यासाठी जास्त उत्सुक दिसतात. त्यास पसंती दर्शवतात. {७४% सामाजिक कार्यक्रमात सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होतात. {६८% भविष्यातील योजना, आरोग्य सुविधा इत्यादी सेवा घेण्याआधी इंटरनेटवर त्याची माहिती जाणून निर्णय घेतात. {४०% आरोग्यविषयक डेटा शेअर करतात. {७४ % ऑनलाइन मेडिकल कन्सल्टेशनवर जास्त विश्वास ठेवतात. { १८ ते २५ वयोगटातील तीनपैकी एक चिंता, तणाव, नैराश्याने ग्रासलेला.

बातम्या आणखी आहेत...