आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंभीर आजारांसाठी वापरली जाणाऱ्या औषधांचा नशेसाठी वापर करुन ती अवैधपणे तरुणांना पुरवणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे यात फार्मसीचे शिक्षण घेणारा तरुणच नशेखोरांचा मोठा एजंट बनल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याशिवाय तो रेकॉर्डवरील गुन्हेगारा सोबत गुंगीकारक 120 औषधी बाटल्या घेऊन जाताना आढळून आला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद फैसल मोहम्मद अय्याज (22, रा. बारी कॉलनी) असे या फार्मसीच्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यासह शेख जावेद शेख कलीम (27, रा. शहाबाजार) या रेकोर्डवरील संशयितालाही पोलिसांनी अटक केली.
तो सुशिक्षित घरातला
फैसल सुशिक्षित घरातला मुलगा आहे. मात्र, नशेच्या आहारी गेल्यानंतर त्याने नशाकारक औषधांची विक्री सुरू केली. हे पाहून पोलिसांसोबतच त्याचे कुटूंबियही थक्क झाले.
अशी लागली संगत
फैसल सुशिक्षित व सधन कुटूंबातला आहे. सद्याा तो बीफार्मसीचे शिक्षण घेतो. मात्र, औषधशास्त्राचे शिक्षण घेता घेता तो स्वत: नशेच्या आहारी गेला. त्यानंतर त्याची विक्री देखील करु लागला. त्याच्यासोबत पकडला गेलेला जावेद रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. फैसल च्या अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ऍपल मोबाईलसह चार फुट लांबीचा चाकु आढळला. नशेखोरी च्या व्यवसायात अनेकांशी शत्रुत्व तयार होते. कोण कधी वाद घालेल, दुश्मनी काढेल सांगता येत नाही म्हणुन चाकु बाळगत असल्याचे त्यांनी सांगितले.
सापळा रचून घेतले ताब्यात
सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांना शनिवारी गणेश कॉलनी ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गावर एक तरुण नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीची औषधांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. गिरी यांच्या सुचनेवरुन गांगुर्डे यांनी तत्काळ औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांना संपर्क करुन पथक तयार केले. सहा वाजता पथक किले अर्क, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे राहत कलनी कडे रवाना झाले. साध्या वेशात उभे असताना त्यांना लाल रंगाच्या मोपेडवर दोन तरुण जातना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी दुचाकीचा वेग वाढवला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनी पळत जावुन दोघांना पकडले.
फैसलकडे सापडल्या 120 बाटल्या
दोघांची नावे कळाल्यानंतर फैसल कडे असलेल्या पिशवित नशा आणणारे औषध दिसले. हिमाचल प्रदेश मध्ये उत्पादित झालेल्या पातळ औषधाच्या १२० बाटल्या आढळून आल्या. निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह अंमलदार विलास काळे, मुनीर पठाण, शाहीद पटेल, गफ्फार पठाण, बनकर, देशराज मोरे, बबन इप्पर, सोहेल पठाण यांनी कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.