आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या चौघांवर गुन्हा; एका कार सह मोबाईल जप्त

हिंगोली9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सीडीआरवरून सट्टा खेळणाऱ्यांचा शोध सुरु

आखाडा बाळापूर येथे आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या चाैघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १४ पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक स्वीफ्ट कार सह, मोबॉईल व इतर साहित्य जप्त केले आहे. आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेल्या मोबॉईलचे सीडीआर काढून इतरांची चौकशी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील एका जीनींगच्या मोकळ्या मैदानावर एका कारमध्ये बसलेले चौघे जण आयपीएलवर सट्टा घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक किशोर पोटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी बोके, विलास सोनवणे, विठ्ठल कोळेकर, सुनील अंभोरे, राजूसिंह ठाकूर, विशाल घोळवे, ज्ञानेश्‍वर सावळे, किशोर सावंत यांच्या पथकाने मंगळवारी ता. १३ रात्री एका कारवर छापा टाकला.

यावेळी कारमध्ये बसलेले पवन कैलास आळणे, किशन श्रीराम कोकाटे, अनिल विश्‍वनाथ पवार, विट्ठल नामदेव पतंगे (सर्व रा. आखाडा बाळापूर) हे मुंबई इंडियन्स विरुध्द कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यावर सट्टा घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल एक कार असा ७.८६ लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान, सदर चौघेजण सट्टा घेत असल्याने त्यांच्या मोबाईलवर कोण सट्टा लावत होते याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. त्यासाठी या चौघांच्या मोबाईलवर त्या वेळेत कोणाचे कॉल आले होते, किती वेळेस आले होते याचे सीडीआर काढून त्यानुसार त्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...