आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अवैधरित्‍या नशेच्‍या औषधींचा साठा:दोन प्रकरणांत रिक्षाचालकासह चौघांना अटक; 15 जूनपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद अवैधरित्या नशेच्‍या औषधींचा साठा करून त्‍याची विक्री करणाऱ्या दोघांना सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्‍यांच्‍याकडून नशेच्‍या औषधींसह एक चाकू आणि दुचाकी असा सुमारे 95 हजार 360 रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे.

63,620 रुपयांचा ऐवज जप्‍त

शेख जावेद शेख कलीम आणि मोहम्मद फैसल मोहम्मद अय्याज अशी आरोपींची नावे आहेत. दुसऱ्या प्रकरणात अवैधरित्‍या नशेच्‍या औषधींचा साठा करून त्‍याची विक्री करणाऱ्या रिक्षा चालकासह एकाला एनडीपीएस स्‍पेशल ऑपरेशन सेलने सापळा रचून अटक केली. त्‍यांच्‍याकडून नशेच्‍या औषधींसह 63 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला. चार आरोपींना 15 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. बी. पाटील यांनी दिले.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सिटीचौक पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सापळारचून अवैधरित्‍या नशेच्‍या औषधींची विक्री करण्‍यासाठी दुचाकीवर आलेल्या दोघांच्‍या मुसक्या आवळल्या. त्‍यांच्‍याकडून 12 हजार 480 रुपये किंमतीची नशेची औषधी हस्‍तगत केली. तसेच मोहम्मद फैसल याची अंगझडती घेतली असता त्‍याच्‍याकडून एक चाकू, 1020 रुपयांची रोख रक्कम, मोबाइल आणि दुचाकी 81 हजार 510 रुपयांचा तर आरोपी शेख जावेद याच्‍या ताब्यातून एक मोबाइल असा सुमारे 95 हजार 360 रुपये किंमतीचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला. या प्रकरणात उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

एन. डी.पी.एस. सेलची कारवाई

दुसऱ्या प्रकरणात माजेद खान चांद खान असे रिक्षा चालकाचे तर शेख अकबर शेख पाशा असे त्‍याच्‍या साथीदाराचे नाव आहे. दरम्यान, एनडीपीएस स्‍पेशल ऑपरेशन सेलचे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे यांनी तक्रार दिली. त्‍यानूसार, 11 जून रोजी सहयक निरीक्षक सय्यद यांना माहिती मिळाली की, कटकट गेटकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावरील वॉशिंग सेंटरसमोरील रविंद्र नगरात दोन व्यक्ती दुचाकीवर नशेची औषधी विक्री करण्‍यासाठी येणार आहे. माहिती आधारे सहाय्यक फौजदार भंडारे व त्‍यांच्‍या सहकार्यांनी सापळारचून वरील दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या.

आरोपींना कोठडीत ठेवण्याचे आदेश

दोघा आरोपींची चौकशी केली असता, नशेची औषधी मुजीब आणि सईद शेख यांच्‍याकडून एक नशेची बाटली 195 रुपयांना विकत घेवून ती 250 ते 300 रुपयांना विकतो अशी माहिती आरोपींनी दिली. या प्रकरणात जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. सिटी चौक आणि जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...