आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अचानक ब्रेक दाबल्याने सेव्हन हिल्सजवळ चार कार आदळल्या, रात्री 10:30 वाजता घटना घडली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना रस्त्यावरील सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ ४ गाड्या एकमेकांवर धडकल्याने अपघात झाला. हा अपघात रात्री १०:३० वाजता झाला. यात सुदैवाने गंभीर जखमी झाले नसून किरकोळ मार लागला आहे. या वेळी महिला पोलिसांची पेट्रोलिंगची गाडी तत्काळ आल्याने रहदारीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

हायकोर्टाकडून मोंढा नाक्याकडे जाणाऱ्या स्कोडा गाडीत महिला बसलेल्या होत्या. त्यांनी उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी जोरात ब्रेक मारल्याने त्यांची गाडी थांबली. परंतु, पाठीमागून येणाऱ्या चारचाकीधारकांनी जोरात ब्रेक दाबले असता, तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर महिलांची स्कोडा गाडी सुसाट निघून गेली. त्यामागील इनोव्हा (एमएच २० ईसी ००२१), ह्युंदाइ क्रेटा (एमएच २० वाय २३८८) तर सगळ्यात शेवटी फोर्ड (एमएच २० बीवाय ०८८२) गाडी होती. ह्युंदाई क्रेटा इन्होवावर आदळली. त्यामुळे क्रेटामधील एक एअर बॅग उघडली. तर फोर्डमधील ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या महिलेचे कपाळ समोर आदळल्यामुळे त्याही किरकोळ जखमी झाल्या. जालना रस्त्यावर गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या गाडीने तत्काळ वाहतुकीचे नियंत्रण केल्याने रस्त्यावरील गर्दी टळली. गस्तीवरील पोलिस कॉन्स्टेबल मीना जाधव, सविता गाडेकर, छाया जाधव यांनी वाहतूक सुरळीत केली. स्कोडामधील महिला घटनास्थळापासून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. संबंधित स्कोडाचा क्रमांकही कोणालाही घेता आला नाही.

बातम्या आणखी आहेत...