आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:चार दिवस उशिराने मान्सूनने घेतला निरोप; राज्यात सरासरीच्या 19% जास्त, मराठवाड्यात सर्वाधिक 48% पाऊस

औरंगाबाद / अजय कुलकर्णीएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा राज्यात निर्धारित वेळेच्या पाच दिवस आधीच आगमन केलेल्या नैऋत्य मोसमी पावसाने अर्थात मान्सूनने चार दिवस जास्त मुक्काम ठोकत गुरुवारी (दि. १४ ) राज्याचा निरोप घेतला. केरळात यंदा दोन दिवस उशिराने म्हणजे तीन जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. तेथून वेगाने तो पाच जून रोजी महाराष्ट्रात पोहोचला. जून ते ३० सप्टेंबर या काळात यंदा राज्यात सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त पाऊस झाला. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चार हवामान उपविभागांपैकी यंदा मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा ४८ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला.

जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस : राज्यात यंदा जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला. राज्यात चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. नंदुरबार, सांगली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

बातम्या आणखी आहेत...