आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचे, अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय, उ.महाराष्ट्र किनाऱ्यावर चक्रवात स्थिती

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस शक्य

अरबी समुद्रात सक्रिय झालेले नैऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यास अनुकूल स्थिती यामुळे राज्यात चार ते सात ऑगस्ट या काळात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्यानुसार, मान्सूनचा आस सध्या राजस्थानपासून ते पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत अशा सर्वसाधारण स्थितीत आहे. त्यातच चार ऑगस्टला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर चक्रवात स्थिती आहे. राज्यात जोरदार पावसासाठी ही अनुकूल स्थिती आहे, त्यामुळे चार ते सात ऑगस्ट या काळात कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस शक्य
कुलाबा वेधशाळेने चार ते सात ऑगस्टसाठी कोकणासह पुण्यात रेड अलर्ट तर इतर काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
- रेड अलर्ट (२०४.५ मिमीपेक्षा जास्त पाऊस) : मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे
- ऑरेंज अलर्ट (११५.५ ते २०४.४ मिमी पाऊस) : नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, सातारा, कोल्हापूर व विदर्भ
- यलो अलर्ट (६४.५ ते ११५.४ मिमी पाऊस) - धुळे, नगर, सोलापूर, जालना
- ग्रीन अलर्ट (१५.५ ते ६४.४ मिमी) : जळगाव, नंदुरबार, नांदेड, हिंगोली, परभणी

बातम्या आणखी आहेत...