आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कलगाव येथे चार घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक; एक बैल, चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

हिंगोली तालुक्यातील कलगाव येथे चार घरांना लागलेल्या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्यासह अन्न धान्य जळून खाक झाले आहे. या आगीत एक बैल व चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी ता. 21 रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हिंगोलीच्या अग्नीशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलगाव येथील सखाराम रामजी वाघमारे यांच्या घराला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराला अचानक आग लागली होती. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरात झोपलेले सर्व जण बाहेर पडले. त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी दाखल झाले.

गावकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. मात्र आग अधिकच भडकत गेली. या आगीमध्ये वाघमारे यांचा एक बैलाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीची झळ शेजारी राहणाऱ्या किसन किरडिले यांच्या घराला बसली. त्यांच्या घरातील चार शेळ्या होरपळून दगावल्या. या दोन्ही घरांमधील संसारोपयोगी साह‍ित्य, धान्य जळून खाक झाले. तर बाळु गौतम धवसे, रामजी किशन वाघमारे यांच्या घराचा समोरील भाग जळून नुकसान झाले. या सर्व घटनेमध्ये सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिंगोलीच्या अग्नीशमनदलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मध्यरात्री आग आटोक्यात आणली.

मात्र तो पर्यंत दोन घरांचे पूर्ण जळून नुकसान झाले होते. दरम्यान, आज तहसीलदार पांडूरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ. मिलींद पोहरे, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, मुकुंद कारेगावकर, ग्रामसेविका बोरकर यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून महसुल विभागाकडून शासन निर्णयाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याचे तहसीलदार माचेवाड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...