आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा परिसरातील श्रीक्षेत्र कडेपठारावर ८ जानेवारी रोजी खंडाेबा यात्रा व पालखी उत्सव होणार आहे. त्यासाठी २० ते २५ हजार भाविक उपस्थित राहतील. मात्र, खंडाेबा मंदिरापासून ते कडेपठारापर्यंत ९ किलोमीटरचा कच्चा रस्ता डोंगरकपारीतून आहे. तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिराची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याचीही साेय नाही. त्यामुळे शासनाने विकास निधी द्यावा, अशी मागणी ट्रस्टकडून होत आहे. खंडोबाचे मूळस्थान कडेपठार आहे. मात्र, जीर्ण अवस्थेत मंदिर असून, येथे खंडोबा, म्हाळसा, बानू यांची शिळा आहे. तसेच चारही बाजूंनी दगडी शिळाचे बांधकाम आहे. पण, मंदिराची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. ८ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता खंडोबा मंदिरापासून ते कडेपठारपर्यंत पालखी काढली जाणार आहे. साडे दहा वाजता महाआरती होईल.
सभामंडप, पुजाऱ्याच्या राहण्याची व्यवस्था, अन्नछत्रालय, संरक्षण भिंतीची गरज दोन वर्षांपूर्वी कडेपठाराचा खंडोबा सातारा या नावाने राजेंद्रसिंग जबिंदा यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्ट स्थापन केला. येथील द्वारे, भक्तनिवास सभामंडप, पुजाऱ्याच्या राहण्याची व्यवस्था, अन्नछत्रालय, सरंक्षण भिंत, पाण्याची व्यवस्था आदी कामांसाठी निधी लागणार आहे. काम लोकप्रतिनिधींसह लोकसहभागातून करण्याचा प्रयत्न ट्रस्ट करणार आहे.
वास्तूचा विकास व्हावा सातारा परिसरातील कडेपठार पुरातन वास्तू आहे. या ठिकाणी वर्षभरात एक लाख भाविक येतात. या वास्तूचा विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधीकडे मागणी केली. -सोमीनाथ शिराणे, सचिव, श्रीक्षेत्र कडेपठार
िहलस्टेशन तयार करणार खंडोबा मंदिराला शासनाने निधी मंजूर केला आहे. त्याप्रमाणे कडेपठारचा विकास करायचा आहे. रस्ते, पाणी, वीजपुरवठ्यासह इतर विकास कामे केली जाणार आहेत. एक हिलस्टेशनही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. -संजय शिरसाट, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.