आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर पोलिसांनी रविवारी रात्री दीड वाजता दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ संशयित आरोपींना अटक केली होती. त्यानंतर काही वेळातच पाचही आरोपींनी नवापूर पोलिस स्टेशनच्या लॉकअप खिडकीचे गज कापून पोबारा केला. आरोपी लॉकअप तोडून फरार झाल्यानंतर शेतामध्ये लपल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानंतर नंदुरबार पोलिस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. यात गुजरात पोलिसांना हैदर ऊर्फ इस्राईल इस्माईल पठाण (२०, रा. कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) या आरोपीला माणिकपूर गावाजवळून पकडले आहे. स्थानिक नवापुरातील नागरिक आणि पोलिस एकमेकांच्या मदतीने फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेले पाचही आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.
रविवारी रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी नवापूर शहर रेल्वे गेटजवळ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना अटक केली होती. सर्वजण चंदन तस्करी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आरोपींच्या गाडीत दरोड्यासाठी लागणारी हत्यारे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतकऱ्याच्या झोपडीत केले जेवण : नवापूर पोलिस ठाण्यातून आरोपी शास्त्रीनगर, स्मशान रोड, तीनटेंभा, भरवाड फळी, तालुका कृषी कार्यालयासमोरील शेत, सुमल डेअरी उच्छल, सुंदरपूर लालमाती, माणिकपूर भागातून पळाले. पळालेल्या आरोपीने शेतकऱ्याकडे जेवणपाणी आणि मोबाइलची मागणी केली. भरवाड फळीतील एका शेतात महिलेकडून पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. मात्र, महिला घाबरून पळून गेली. गुजरात राज्यातील माणिकपूर येथे तीन आरोपींनी एका शेतकऱ्याचा झोपडीत वयोवृद्ध महिलेकडून जेवणाची मागणी केली. यातील एका आरोपीने जेवण केले.
कन्नडच्या एका आरोपीला पकडले गुजरातच्या सीमेमध्ये इरफान इब्राहिम पठाण (३५), युसूफ आसिफ पठाण (२२), गौसखाँ हनीफखाँ पठाण, ३४, सर्व आरोपी रा. ब्राह्मणी गराडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), अकीलखाँ इस्माईलखाँ पठाण (२२, रा. कठोरा बजार, ता. भोकरदन, जि. जालना) अशी आरोपींचे नावे आहेत.
नवापूर येथील तुरुंगाच्या याच खिडकीचे गज आरोपींनी कापले. गुजरात पोलिसांना दिली माहिती खिडकी तोडून आरोपी फरार झाल्यानंतर घटना पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. लागूनच गुजरातची सीमा असल्याने गुजरात पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. गुजरात पोलिसांना उच्छल गावाजवळ एक आरोपी सापडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.