आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
31 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड व अहमदनगर जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने रात्री 12.30 वाजताच्या सुमारास शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असणा-या विदेशी दारूच्या 50 पेट्या जप्त केल्या. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 3 लाख 64 हजार 800 इतकी आहे.
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कांतीलाल उमाप व पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बीडचे अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बीड व अहमदनगर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावातील रामराव कृष्णाजी जायभाये याच्या घरात रात्री 12.30 वाजता धाड टाकली असता घरातून गोवा राज्याच्या बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आल्याने रामराव कृष्णाजी जायभाये याला अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ)(ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गोवा राज्याची दारु चोरी छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणून अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याने आरोपीचा मुलगा बाळासाहेब रामराव जायभाये याचेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून धाड पडल्याची माहिती मिळताच तो पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. तसेच यामागे असलेल्या सूत्रधाराचाही शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत आहे.
सदर धाडीत गोवा राज्यातील बनावटीच्या विदेशी मद्याच्या मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 1776 सीलबंद बाटल्या, इंपेरियल ब्ल्यु व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 240 सीलबंद बाटल्या, ब्लॅक डीएसपी विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 288 सीलबंद बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्या व ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्या, अशी 3 लाख 64 हजार 800 रुपयांची दारु, 1 मोटरसायकल क्रमांक MH 23 AZ 0842 किंमत रु. 40 हजार, 1 मोबाईल किंमत रु. 5 हजार व बाटल्यांवर लावण्यासाठी बनावट लेबल 3000 नग किंमत रु. 6 हजार असा एकूण 4 लाख 15 हजार 800 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईत निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड डि.एल.दिंडकर, जवान सांगुळे, वाहनचालक शेळके व अहमदनगर जिल्ह्यातील निरिक्षक बनकर, निरिक्षक शघोरतळे, दुय्यम निरिक्षक बडदे, सूर्यवंशी, धोका, ठोकळ, बारावकर व त्यांचेसोबत जवान ठुबे, वामने, बिटके, कांबळे, बटुळे व महिला जवान श्रीमती आठरे यांनी सहभाग नोंदविला.
आवाहन
नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.