आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट चावी:मोपेडच्या डिकीतून चार मोबाइल लांबवले ; पुुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमबीएच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी मोपेड दुचाकीच्या डिकीत मोबाइल ठेवणे ४ विद्यार्थ्यांना महागात पडले. चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने डिकी उघडून माेबाइल लंपास केले. ही घटना २ जानेवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान एन-४ मधील विद्याधन महाविद्यालयात घडली.

धनराज सूरज उढाण (२३, रा. बीड बायपास), ऋषिकेश शामराव शिंदे (२३), भूषण सतीश तायडे (२५, रा. बजाजनगर), दिलीप रमेश राठोड (२५, रा. बिडकीन) यांचा परीक्षेसाठी विद्याधन महाविद्यालयात क्रमांक लागला होता. मोबाइल सोबत नेण्यास परवानगी नसल्याने त्यांनी त्यांच्या मोपेड दुचाकीत मोबाइल ठेवले. मात्र, परीक्षा देऊन बाहेर आल्यावर चौघांचेही मोबाइल लंपास झाले होते. याप्रकरणी पुुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...