आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:2 दिवस एकही नवीन पेशंट नव्हता आता औरंगाबादेत सापडले 4 नवे कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या नव्या रुग्णांसह शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 24 वर

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवेस वाढत आहे. यातच आता औरंगाबादमधील रुग्णांमध्येही भर पडली आहे. आज औरंगाबादमद्ये चार नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यासोबतच शहरातील कोरोना बाधिकांचा आकडा 24 वर पोहचला आहे.

औरंगाबादमध्ये मागील दोन दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आज आढळलेल्या चार कोरोना पॉझिटिव्हपैकी एकजण याआधी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे 70 वर्षीय आजोबा आहेत तर दुसऱ्या एका कोरोनाग्रस्ताची 30 वर्षीय पत्नी आणि 11 वर्षांची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तसेच, चौथ्या एक 33 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. यासोबतच महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 2006 वर गेला आहे. आज महाराष्ट्रात एकूण 82 रुग्णांची भर पडली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 59 नवीन केसेस समोर आल्या आहेत. तर मालेगावात 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 2064 वर गेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...