आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांजणगावात जातीवाचक शिवीगाळ:महिलेला मारहाणप्रकरणी चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रांजणगाव शिवारात राहणाऱ्या कोमल अशोक इंगोले (वय, 22 वर्ष, रा. न्यू हनुमान नगर, कमळापूर ता. गंगापूर) या महिलेला शेजारी राहणाऱ्या चौघांनी किरकोळ कारणातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी कोमलच्या तक्रारीवरून शेजारी राहणाऱ्या संजय आंधळे, अलका आंधळे, संतोष आंधळे, पूजा आंधळे या चौघांवर मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार 15 जून रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शाब्दिक चकमक उडाली

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कमळापूर फाटा, रांजणगाव शिवारात राहणारी कोमल इंगोले ही महिला वाळूज येथील ल्युमॅक्स कंपनीत काम करते तर पती जिल्हा न्यायालयात वकिलीचा व्यावसाय करतात. दरम्यान 13 जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोमल किराणा दुकानातून समान खरेदी करून घरी परत येत असताना शेजारी राहणाऱ्या संजय आंधळेने त्याच्या ताब्यातील तवेरा वाहन (एमएच-20,बीवाय-3643) बेजबाबदारपणे चालवून वाहनाचा धक्का कोमलला लागला. त्यावर कोमलने जाब विचारला असता संजय व कोमलची शाब्दिक चकमक उडाली.

जातीवाचक शिवीगाळ

पुढे याच करणातून दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी कोमल यांच्या अंगणात उभे राहून आंधळे कुटुंबियांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पुढे संतोष आंधळेने कोमलला दरवाजातून ओढून त्याचे हातातील धारदार वस्तूने कोमलच्या डाव्या हाताला मनगटाजवळ मारल्याने ती जखमी झाली. त्यावेळी पूजा आंधळे, अलका आंधळे, संजय आंधळे, यांनी कोमलला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पुढे शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नंदा चौके, उषा सुर्वे व अशोक इंगोले यांनी मध्यस्ती करत भांडण सोडवले. घटनेनंतर कोमलने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान घाटी रुग्णालयात जाऊन आल्यानंतर बुधवारी 15 जून रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...