आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:आंबाळा पाटी जवळ भरधाव वाहनाची दुचाकीस धडक, चार वर्षाचा मुलगा ठार, दोघे गंभीर जखमी

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर आंबाळा पाटी जवळ दोन दुचाकीची समोरा समोर झालेल्या धडकेत एक चार वर्षाचा मुलगा ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ९) सायंकाळी घडली आहे. जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्हयातील अंजनखेडा येथील पांडूरंग शिवाजी कव्हर, गोदावरी पांडूरंग कव्हर व त्यांचा मुलगा रुद्र पांडूरंग कव्हर (४) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथे आले होते. खंडाळा येथे काम आटोपून ते परत गावाकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन आंबाळापाटी जवळ आले असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात रुद्र कव्हर (४) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश बरडे, गोरेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मारोती नंदे, उपनिरीक्षक गजानन पाटील, उपनिरीक्षक राहुल तायडे, जमादार राजेश ठोके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी पांडूरंग कव्हर यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अन्य दुचाकीवरील जखमीचे नांव कळू शकले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser