आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहडको येथील सुदर्शननगरातील १००८ कल्पतरू शांतिनाथ अग्रवाल दिगंबर जैन मंदिराच्या प्रांगणात १४ लाखांच्या मानस्तभांची उभारणी करण्यात आली. यानिमित्ताने ३ दिवसीय मानस्तंभ पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य सौभाग्यसागर महाराज यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशीच सोहळा झाला. शहरात दिगंबर जैनांमधील साहुजी समाजाची ५०० कुटुंबे आहेत. त्यांनी २००६ मध्ये दोन हजार चौरस फुटांमध्ये जैन मंदिराची उभारणी केली. या मंदिराच्या प्रांगणात आता संगमरवरात बनवलेला मानस्तंभ उभारण्यात आला आहे.
मानस्तंभाची गरज : प्रत्येक मंदिराच्या प्रांगणात मानस्तंभ उभारला पाहिजे. कारण, विविध कारणांनी जे भाविक मंदिरात प्रवेश करू शकत नसतील त्यांना या मानस्तंभावरील मूर्तींचे दर्शन घेता येते. याशिवाय जैनेतर बांधवांनीही जैन भगवंतांचे दर्शन घडते. यासाठी मानस्तंभ उभारला जातो. आज जागेनुसार सर्वांनाच हे शक्य हाेत नाही. मात्र, शक्य तिथे हे उभारावे.
३ दिवसांच्या उत्सवात तीर्थंकरांची कहाणी तीर्थंकरांचा जन्म, विवाह आणि मोक्ष असे तीन महत्त्वाचे प्रसंग नाटकातून उभे केले जाणार आहेत. ३४ भाविकांनी या नाटकात भाग घेतला आहे. पहिल्या दिवशी तीर्थंकरांच्या आईला पडलेल्या चौदा स्वप्नांचा प्रसंग दाखवण्यात येणार आहे. सुरेश साहुजी, कोषाध्यक्ष, पंचकल्याणक महोत्सव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.