आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:चौदावर्षीय मुलीला शेतात नेत अत्याचार ; मंगळवारी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चौदा वर्षांच्या मुलीला उचलून शेतात नेत तिच्यावर तीस वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना वडगाव परिसरात घडली. रमेश येडूबा मोरे असे आरोपीचे नाव असून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी त्याला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी परिसरात एका कुटुंबाच्या घरी हळदीचा कार्यक्रम असल्याने सर्वजण तेथे उपस्थित हाेते. सायंकाळी सात वाजता त्यांची चौदा वर्षांची मुलगी गायब असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध सुरू केला.

तेव्हा मुलगी मोठमोठ्याने रडत जवळच्या शेतातून पळत घराच्या दिशेने येताना दिसली. आईने तिला जवळ घेऊन विश्वासात घेतल्यानंतर तिने ‘रमेश काकांनी मला बळजबरीने शेतात ओढत नेत मला तू आवडतेस असे म्हणून अत्याचार केल्याचे सांगितले’. कुटुंब घाबरल्याने त्यांनी मंगळवारी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर रमेशवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, चोवीस तासांत एका पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल झाले. एका दहावीतील मुलीला ओळखीच्याच तरुणाने गेल्या पाच महिन्यांपासून एका ढाब्यावर नेत अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...