आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:करसल्लागाराकडून बिल्डरची पाच लाख रुपयांची फसवणूक ; प्रमाणपत्र देऊन रक्कम लांबवली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध करांचा भरणा करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेले ५ लाख ५८३ रुपये कर न भरता परस्पर लाटल्याप्रकरणी कर सल्लागार प्रिया जोशी व योगेश जोशी यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी कर भरल्याचे खोटे विवरणपत्र दिल्याचे बांधकाम व्यवसायिक मोहित शिवकिशोर त्रिवेदी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पाच वर्षांपासून त्रिवेदी जोशींमार्फत करभरणा करतात. योगेश जोशी हा प्रिया यांचा नातेवाईक असून योगेशच त्रिवेदी यांचे पैसे स्वीकारत होता. आयकर विवरण भरल्यानंतर त्याचे विवरणपत्र तो ई-मेलवर पाठवत असे. जुलै २०२० मध्ये तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र जोशीने त्रिवेदी यांना मेलवर पाठवले. मात्र, २०१५ ते २०१६ मध्ये केवळ २ हजार ५१३ रुपयांचाच भरणाा झाल्याचे दाखवले होते. संशय आल्याने त्रिवेदी यांनी संपूर्ण वर्षाचे विवरणपत्राची तपासणी केली. यात मोठी तफावत असल्याचे समोर आले. त्रिवेदी यांचे भाऊ सुमीत यांनी जोशी यांच्या खात्यावर ३ लाख रुपये, तसेच १ लाख ९१ हजार रोख दिले होते. मात्र, २०१७ ते २०१८ चा कर न भरता जोशीने मात्र ही रक्कम भरल्याचे खोटे विवरणपत्र पाठवल्याचेही उघड झाले, असे २०१५-१६, २०१७-१८ मध्ये एकूण ५ लाख ५८६ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...