आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमचे एसबीआय योनो खाते निलंबित करण्यात येत असल्याचे सांगून एक लिंक पाठवत सायबर गुन्हेगारांनी बँक खात्यातून दीड लाख रुपये लंपास केले. सर्वोच्च न्यायालयाचे वकील जगतनारायण सिंग (५४) यांच्यासोबत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, त्याच्या बँक खात्याला दिवसाला २५ हजार रुपयांची मर्यादा असताना दीड लाख वळती झाल्याने बँकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.
नाेएडा येथील सिंग शहरातील रामनगरमध्ये कुटुंबासह राहतात. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांना मोबाइलवर मेसेज आला. तुमचे एसबीआयचे योनो खाते निलंबित करण्यात आले आहे. सोबतच्या लिंकवर क्लिक करून पॅनकार्ड अपडेट करा, असा संदेश त्यात होता. सिंग यांनी त्या लिंकवर क्लिक केले. मात्र, पॅनकार्डचा पर्यायच न आल्याने संशय येताच त्यांनी ती प्रक्रिया लगेच बंद केली. मात्र, तिसऱ्या मिनिटाला त्यांच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ९९९ रुपये वळते झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.