आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:कोरोना काळात जेवण पुरवण्याचे आमिष दाखवून हॉटेलच्या मालकीची 41 लाखांची फसवणूक; आरोपीवर गुन्हा दाखल

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद कोरोना काळात मुंबईतील जे.जे हॉस्‍पीटल येथील चार हजार लोकांना जेवण पुरवण्‍यासह विविध जिल्ह्यात कंत्राट देण्‍याचे आमिष दाखवून हॉटेल नैवेद्यच्‍या मालाकाला 41 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी आरोपी संदिप बाबुलाल वाघ याच्‍या पोलिस कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी दिले आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

दरम्यान, हॉटेल नैवेद्य चे भक्तबंधु रामचंद्र पाढी यांनी तक्रार दिली. कोरोना काळात औरंगाबाद, कोल्हापुर, नाशिक, पुणे, जालना, परभणी, सांगली, साताऱ्यात अशा विविध ठीकाणी तसेच मुंबईतील जे.जे. हॉस्‍पीटल मधील चार हजार लोकांना जवेण पुरवण्‍याचे काम देण्‍याचे आमिष दाखवून फिर्यादीला 41 लाख पाच हजार रुपयांना गंडा घातला. प्रकरणात एमाआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

काय आहे घटना

आरोपी संदिप वाघ याच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सरकारी वकीलांनी आरोपीकडून बनवाट दस्‍ताऐवज हस्‍तगत केले आहे. सरकारी नोकर असल्याचे सांगत कागदपत्रे दाखवली होती. आरोपी स्‍वप्‍नील नांद्रे याने फिर्यादीकडून 4 लाखांची रोख रक्कम घेतली होती. ती रक्कम हस्‍तगत करायची आहे. आरोपीच्‍या महिला साथीदाराचा शोध घेवून तिला अटक करायची असल्याने आरोपीच्‍या पोलिस कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...