आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शहरातील मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा, मनपा हद्दीतील आरटीई प्रवेशास आयुक्तांची मान्यता

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

गेल्या तीन-चार महिन्यापासून आरटीई प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला असून, मनपा हद्दीतील आरटीई प्रवेशास आयुक्तांनी परवानगी दिली असल्याने प्रवेशचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधीच्या सूचना देणारे पत्र जाहिर करण्यात आले आहे. अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा या हेतूने मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा राबविण्यात येतो. गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता असावी या हेतूने ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते आहे. यंदा मात्र जानेवारीत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्यामुळे लवकरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल अशी आशा होती. परंतु देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे प्रवेश लांबले. तर एकच ड्रॉ करण्याचा निर्णय घेत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेचा ड्रॉ काढण्यात आला. २० मार्च रोजी हा ड्रॉ झाला होता.मात्र कोरोनाची वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. अशाच ठिकाणीचे प्रवेश पूर्ण करण्यात यावेत. शाळांकडूनच तात्पूर्ती पडताळणी करण्यात यावी. असे आदेश शिक्षण विभागाने दिले. तर मनपा हद्दीतील प्रवेशाबाबत मनपा आयुक्तांच्या परवानगीची प्रतिक्षा असल्याने शहरातील आरटीईची प्रवेश प्रक्रिया थांबली होती.गुरुवारी मात्र थांबलेल्या या प्रवेश प्रक्रियाचा मार्ग मोकळा झाला असून, आयुक्तांनी मनपा हद्दीतील आरटीई प्रवेशास पात्र प्रवेश करण्यास परवानगी दिली. त्याचे पत्र बुधवारी रात्री उशीरा काढण्यात आले. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत ५८४ शाळा पात्र असून, प्रवेश क्षमता ही ५ हजार ४३ आहे. यासाठी औरंगाबादेत १६ हजार ६०० अर्ज आले होते. तर ग्रामीण भागात जिथे रेड झोन नाही येथे राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७५८ प्रवेश निश्चित झाले आहेत. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. ही प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करायची असून, कोरोनामुळे मुदतवाढ देखील मिळू शकते असेही अधिकारी म्हणाले

बातम्या आणखी आहेत...