आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नच:60 दिव्यांग, ज्येष्ठांना मोफत विमान सफर ; 45 मिनिटांची हवाई सफर घडवण्यात येणार

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी विमान प्रवास म्हणजे स्वप्नच. मात्र शहरातील अशा ६० जणांचे स्वप्न वास्तवात येणार आहे. ८ ऑगस्टला सकाळी ७ वाजता दिव्यांग मुले, वृद्धाश्रमातील जेष्ठ, मोलकरणी, शेतकरी, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुमारे ४५ मिनिटांची हवाई सफर घडवण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्मिता हॉलिडेज’, फ्लाय बिग विमान कंपनीने हा उपक्रम हाती घेतला आहे. जयंत गोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ७० आसन क्षमता असलेल्या या विमानात २० दिव्यांग बालके किंवा व्यक्ती , वृद्धाश्रमातील १० जेष्ठ, ५ गृहकर्मचारी, २ संरक्षण कर्मचारी, ८ कोरोना योद्धे आरोग्य कर्मचारी, दुर्बल आर्थिक परिस्थिती असलेले ८ , डॉक्टर, शेतकरी, दोन बिल्डर, व्यापारी, पत्रकार यांना नेण्यात येईल. ज्यांनी अद्याप विमान प्रवास केलेला नाही, त्यांना विमान प्रवास घडावा, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...