आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

306 महिलांची करण्यात आली रक्ताची तपासणी:मनपाच्या कैसर काॅलनी रुग्णालयात 217 महिलांची मोफत तपासणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचा आरोग्य विभाग, शासकीय कर्करोग रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या विद्यमाने कैसर कॉलनी रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मेडिसिनतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, जनरल सर्जन, कान, नाक, घसातज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, तपासणी, समुपदेशन व रक्त तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.

शिबिरात २१७ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महापालिकेतर्फे महिलांची मोफत गर्भाशय मुख कर्करोग तपासणीही करण्यात आली. ३०६ महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे सीईओ डॉ. अरविंद गायकवाड, माजी नगरसेवक मोहसीन अहमद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...