आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान व समाजबांधवांचा गौरव:जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने रविवारी मोफत आरोग्य शिबिर

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने मराठा सेवा संघ व सर्व प्रणित कक्ष औरंगाबादच्या वतीने २९ जानेवारीला जिजाऊंची सिंहासनाधिष्ठित मूर्ती स्थापना, रक्तदान, आरोग्य शिबिर, व्याख्यान व समाजबांधवांचा गौरव आयोजित करण्यात आला आहे.बाबा पेट्रोल पंप येथील जिजाऊ मंदिर, राजर्षी शाहू भवन या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत रक्तदान व आरोग्य शिबिर होईल. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी डॉ. अमोल बुकन, डॉ. राहुल वहाटुळे यांची उपस्थिती राहील. दुपारी १२ वाजता व्याख्याते विठ्ठल भुसारे यांचे “राष्ट्रमाता जिजाऊ : अखिल मानवाची प्रेरणा’ यावर व्याख्यान व समाजबांधवांचा गौरव होईल. या कार्यक्रमात जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...