आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन:पन्नालालनगरमध्ये आज मोफत आरोग्य शिबिर

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पन्नालालनगर विकास संस्थेअंतर्गत महिला समिती व डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि आरोग्य भारती देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने पन्नालालनगर परिसरात मंगळवारी (१४ मार्च) मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित हे शिबिर पन्नालालनगर अष्टविनायक गणपती मंदिर येथे होणार आहे. या शिबिरात महिलांचे आजार, रक्तदाब, मधुमेह आणि इतर सामान्य आजार याची तपासणी हेडगेवार रुग्णालयातील डॉ. रंजना देशमुख, डॉ. राजश्री पुरोहित करणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालणाऱ्या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रभारी अध्यक्ष श्रीधर ब्राह्मणगावकर, महिला समितीच्या अध्यक्षा संध्या देसाई यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...