आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत मदतीचा हात:कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘हेल्प रायडर्स’ची मोफत सेवा; रुग्णवाहिका, बेड मिळण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅम्ब्युलन्स, प्लाझ्मा डोनेशन, बाहेरून लागणारी औषधे नेऊन देण्याचे काम हा ग्रुप करत आहे

सध्या कोरोनाचा कहर वाढलेला असताना अाैरंगाबादेत अनेक नातेवाइकांना अडचणी येतात. घरातील व्यक्ती जर विलगीकरणात असेल तर खूप हाल होतात. अशा रुग्णांसाठी ‘अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ या ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. रुग्णालयात जागा मिळवून देणे, अॅम्ब्युलन्स, प्लाझ्मा डोनेशन, बाहेरून लागणारी औषधे नेऊन देण्याचे काम हा ग्रुप करत आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अनेक तरुण या ग्रुपशी जोडले गेले.

कोरोना झाल्यावर रुग्णाला अॅडमिट करणे, हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणे, बाहेरून औषधी नेऊन देणे, अंत्यसंस्कारासाठी परवानगी काढणे, बाहेरगावच्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण घेणे यासाठी अडचणी येतात. अशा काळात अॅम्ब्युलन्स हॅलो रायडर्स ग्रुप मदत करत आहे. विशेष म्हणजे या ग्रुपशी जोडलेल्या तरुणांनी जबाबदाऱ्या निश्चित करून काम सुरू केले आहे. गरजूंनी ग्रुपच्या सदस्यांशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

गरजूंनी फाेन करावा
कोरोनासाठी हॉस्पिटलायझेशन म्हटले की सामान्य नागरिकांच्या अंगावर काटा येतो. परिस्थिती देखील तशीच आहे. त्यामुळे आम्ही या ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्याचे ठरवले. गरजूंनी आमच्या सदस्यांशी संपर्क करावा. पुरेपूर मदत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे सर्व सेवा आम्ही मोफत देत आहोत, असे संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवासाठी
पराग धूत- 9579422121
अभिषेक कादी- 8830345356
देवा मनगटे- 9370748455
संदीप कुलकर्णी- 8888819017
आशिष भालेराव- 8275515558
नीलेश सेवेकर- 9970119148

औषधी हवी असल्यास
सुधीर व्यास- 9822039329
जगदीश एरंडे- 8308076999
संदेश अन्नदाते- 9822968229

प्लाझ्मा रक्तपेढी
प्रसाद कस्तुरे- 99872 02969
ऋषिकेश राकडे- 9673407385
दिनेश राटे- 9370389044

रुग्ण, नातेवाइकांचे समुपदेशन
शिल्पा चुडीवाल- 9373121301
श्रीनिकेतन कुलकर्णी- 9552690143
ज्ञानेश्वर पडूळ- 8888374488

बेड मिळण्यासाठी
भूषण कोळी- 9923568383
पवन भिसे- 8793439391
कल्याण जाधव- 7844864486
दीपक साळवे- 9764411443
श्रीकांत मिश्रा- 7709789777
राहुल दुबे- 7387595182

अॅम्ब्युलन्स सेवेसाठी
रितेश जैन- 9529022297
विनोद अप्पारुकर-7709778928
कल्पेश काथार- 9637101667
सचिन पाटील- 9370836283
अमित व्यवहारे- 9209090924

लसीकरण करण्यासाठी
स्मिता नगरकर- 9881178391
किरण शर्मा- 9823492111
स्मिता जोशी- 7350661427

बेडसाठी लिंकला क्लिक करून फॉर्म भरा.
https:/forms.gle/ZY3NbKuwXacnRKtM

प्लाझ्मा दान, समुपदेशनाचीही सुविधा
प्लाझ्मा दान करू इच्छित असाल तर फाॅर्म भरावा.
https:/forms.gle/qPSVCiaVdTEpNbDHA

बातम्या आणखी आहेत...