आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:मुक्ताई सामाजिक प्रतिष्ठानकडून कष्टकऱ्यांसाठी मोफत विमा

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावसिंगपुऱ्यातील मुक्ताई प्रतिष्ठानच्या वतीने कष्टकऱ्यांचा गुरुवारी मोफत विमा काढण्यात आला. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेमार्फत टाटा एआयजी अॅक्सिडेंट पॉलिसीचे एकदिवसीय शिबिरही घेण्यात आले. या योजनेमध्ये ३९९ भरून दहा लाख रुपयांचा अपघाती विमा ३५ कष्टकऱ्यांना काढून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश जिरे होते.

या वेळी मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास वैरागर, सुभाष वाघुले, पोस्ट खात्याचे अधिकारी संजय पाटील, ज्योत्स्ना वैरागर, वैशाली तायडे, प्रवीण खनपटे, प्रवीण बोरगे, रवी निर्मळ, फिलीप दुशिंग, सुशील भालेराव, नितीन पाटोळे, विनोद वैरागर, सुनील बोरगे, अनिल धोत्रे, विद्यासागर घोरपडे, पोस्टमन महेश क्षीरसागर, सय्यद वाजेद यांच्यासह प्रतिष्ठान व पोस्ट कार्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...