आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला मोफत:गरजू महिलांना कायदेविषयक सल्ला मोफत : फौजिया खान

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीडित महिला, कुटुंबांना कौटुंबिक समस्या निवारणासाठी कायदेशीर प्रक्रिया असते याची कमी माहिती असते. त्यामुळे ती कुटुंबे अथवा महिला कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत नाहीत. त्यांना योग्य तो कायदेशीर सल्ला देत न्याय प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे कौटुंबिक समस्या : मोफत समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मदत केंद्राची सुरुवात झाली. केंद्राचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार प्रा. फौजिया खान यांनी केले.

याप्रसंगी कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची ऑनलाइन उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉ. अपर्णा कक्कड, नीलेश राऊत, अॅड. उमा भोसले, छाया जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र यशवंतराव चव्हाण सेंटर कार्यालय, एमजीएम क्रिकेट स्टेडियम बिल्डिंग, सेंट्रल नाका येथे आहे. दर शनिवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत मार्गदर्शन केले जाईल. नाहिद खान या समुपदेशन करतील. अधिक माहितीसाठी- ८६९८०६३५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...