आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासक्षम संघटन, एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी, महानगरपालिका आणि समग्र शिक्षाअंतर्गत शहरातील ० ते ६ आणि ६ ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थी, मुलांसाठी मोफत फिजिओथेरपी सुविधा केंद्राची सुरुवात शुक्रवारी (१ एप्रिल) करण्यात आली. एन-६ सिडको येथील मनपाचे समग्र शिक्षा व प्रशिक्षण केंद्र येथे हे केंद्र आहे. दिव्यांग मुलांची काळजी कशी घ्यावी, फिजिओथेरपीचे महत्त्व आदी सर्व माहिती तज्ज्ञ डॉक्टर, समन्वयकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ही सुविधा मोफत असून पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी केले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते १ या वेळेत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. सध्या या केंद्रावर पाचशे मुलांनी नोंदणी केली आहे. सध्या ३०२७ दिव्यांग असल्याची माहिती आहे. या केंद्राच्या माध्यमातून शहरात किती दिव्यांग आहेत याचीदेखील माहिती ठेवता येणार आहे. पालकांनी मुलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे विहंग विशेष मुलांच्या शाळेच्या संचालिका अदिती शार्दूल यांनी सांगितले. या केंद्रातील कामात सहभागी होण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचे ओंकार वैद्य याने सांगितले.
या वेळी एमजीएम फिजिओथेरपी विभागाच्या डॉ. पल्लवी पळसकर, ज्योती इरावले, दीप्ती साक्रीकर, डॉ. संतोष टेंगले, रामनाथ थोरे, शेरीन पाऊलोज, नम्रता संत, ज्ञानदेव सांगळे, अभिजित जोशी, बी. एन. राठी, आर. पी. दुसे, राजीव बडवे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.