आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीपासून प्रारंभ:रामकृष्ण आश्रमात मोफत निवासी अभ्यासिका, 50 मुलांसाठी सुविधा

औरंगाबाद / गिरीश काळेकर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड बायपास येथील रामकृष्ण मिशन आश्रमाच्या माध्यमातून गरजवंतांना मदतकार्य केले जाते. या अंतर्गत युवा वर्गाच्या समस्या जाणून घेण्यासाठी विवेकानंद युवामंचसोबत मोफत निवासी अभ्यासिकेची सुविधा डिसेंबर- जानेवारीपासून दिली जाणार आहे. यात ५० ते ६० मुलांची सोय होईल, अशी माहिती रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी विष्णूपादानंद यांनी दिली.रामकृष्ण मिशन आश्रमात युवक, ज्येष्ठांसह लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर घेण्यात येते. गरजवंतांसाठी दर रविवारी नाममात्र फीमध्ये तपासणी शिबिर व औषधी दिल्या जातात.

दर रविवारी मार्गदर्शन : महाविद्यालयीन युवकांमध्ये अभ्यास करण्यासाठीची एकाग्रता राहत नाही. मित्रांची संगत व्यवस्थित नसल्याने अनेक प्रकार घडत आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित विषयावर चर्चा, प्रश्नोत्तरे व प्रबोधन, ध्यान या माध्यमातून मोफत मार्गदर्शन स्वामी विष्णूपादानंद करणार आहेत. याची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली. दर रविवारी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत आश्रमात मार्गदर्शन करणार आहेत.

युवकांचे मनोबल वाढवण्यासाठी आश्रमाचा पुढाकार आश्रमात विविध अध्यात्मिक पुस्तके, स्वामी विवेकानंदांवर आधारीत चित्रनगरीतून युवकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. युवकांना २४ तास स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध करुन देत आहे. आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णूपादानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली फर्निचर बनविण्याचे काम सुरू आहे. ५० ते ६० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल.

अभ्यासासोबत अध्यात्माची जोड तितकीच महत्त्वाची अभ्यासासोबतच अध्यात्माची जोड आवश्यक आहे.युवकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी विवेकानंद विचार मंच सुरू केले.अभ्यासिकाही सुरू करणार आहे. स्वामी विष्णुपादानंद महाराज, प्रमुख, रामकृष्ण मिशन आश्रम

बातम्या आणखी आहेत...