आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:शहरातील महिलांना देवगड, शिर्डी, शिंगणापूरची मोफत यात्रा ; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा गणेशोत्सवात देखाव्याची स्पर्धा, कुस्त्यांची स्पर्धा, ढाेल वादन स्पर्धा, रोगनिदान शिबिर आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिलांना देवगड, शिर्डी, शनी शिंगणापूर या देवस्थानांचे मोफत दर्शन घडवून आणले जाणार आहे, अशी माहिती श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष विजय औताडे यांनी दिली. त्यासाठी ९७६४६ ३०००० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महासंघाची भरगच्च कार्यकारिणी रविवारी एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. त्यानंतर औताडे म्हणाले, ‘यंदा महालक्ष्मी देखाव्याची ऑनलाइन स्पर्धा घेतली जाईल. कुस्त्यांची स्पर्धा, ढोक महाराजांचे कीर्तन, ढाेल वादक स्पर्धा, शहरातील योग साधकांचा सत्कार, रोग निदान शिबिर, नृत्य स्पर्धा, विविध शासकीय उपक्रमाअंतर्गत ई-श्रम कार्डचे वाटप, रक्तदान आदी उपक्रम दहा दिवस घेतले जाणार आहेत,’ अशी माहितीही महासंघाच्या वतीने देण्यात आली.

नृत्य, गीत गायन स्पर्धा
गणेश महासंघ व युवा मित्र फाउंडेशनतर्फे शालेय व महाविद्यालयीन गटात नृत्य, गीत गायन स्पर्धा घेतली जाणार आहे. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत स्पर्धा होईल. इच्छुकांनी सचिन अंभोरे ९९७०४०९६४० यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे औताडेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...